भंडारा : अशी घटना घडल्यानंतर एखादा चपराशी, एखादी नर्स यांच्यावर कारवाई करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु, दहा नवजात बालकांचा हकनाक जीव गेल्यानंतर वरिष्ठ अधिकारी जेलमध्ये गेले पाहिजे. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी जेलमध्ये जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सुधारणार नाही, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री, भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सरकारने केली पाहिजे. यासाठी आम्ही सरकारला सात दिवसांचा वेळ दिला आहे. तोपर्यंतच वाट बघू, अन्यथा पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. (व्हिडिओ - प्रतीक बारसागडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.